• Download App
    तबलिगींचे क्वारंटाईनध्येही किळसवाणे वर्तन सुरूच | The Focus India

    तबलिगींचे क्वारंटाईनध्येही किळसवाणे वर्तन सुरूच

    निजामुद्दीन येथील तबलिग जमात मरकझमधून बाहेर काढून त्यांचेच प्राण वाचविण्यासाठी क्वारंटाईन (विलगीकरण) करून ठेवलेल्या तबलिगींकडून किळसवाणे वर्तन सुरू आहेत. दिल्लीतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलेल्या काही जणांनी वैद्यकीय कर्मचार्यांना त्रास देण्यासाठी त्यांच्यासमोर शौच केल्याचा किळसवणा प्रकार उघडकीस आला आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : निजामुद्दीन येथील तबलिग जमात मरकझमधून बाहेर काढून त्यांचेच प्राण वाचविण्यासाठी क्वारंटाईन (विलगीकरण) करून ठेवलेल्या तबलिगींकडून किळसवाणे वर्तन सुरू आहेत. दिल्लीतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलेल्या काही जणांनी वैद्यकीय कर्मचार्यांना त्रास देण्यासाठी त्यांच्यासमोर शौच केल्याचा किळसवणा प्रकार उघडकीस आला आहे.

    तबलिगींना मरकझमधून बाहेर काढण्यासाठी स्वत: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पुढाकार घ्यावा लागला होता. अजूनही येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेले अनेक जण फरार आहेत. स्वत:सोबत आपल्या परिचितांचाही जीव धोक्यात घालत आहेत. पण त्यापेक्षाही भयानक प्रकार म्हणजे त्यांंच्यासाठीच काम करणार्या वैद्यकीय कर्मचार्यांना ते त्रास देत आहेत.वैद्यकीय कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत.

    दिल्ली येथील नरेला क्वारंटाईन सेंटरमध्ये हा प्रकार घडला आहे. संपूर्ण परिसराचे सॅनिटाझेशन करताना तबलिगींना ठेवण्यात आलेल्या ठिकाणांपैकी २१२ नंबरच्या खोली बाहेर काही तबलिगींनी शौच करण्यासारखा किळसवाणा प्रकार केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. यामध्ये त्या दोघांची नावंही देण्यात आली आहेत.या ठिकाणी ठेवलेले तबलिगी कर्मचार्यांना त्रास देत आहेत.

    त्यांच्याविरोधात पोलीसांनी गुन्हाही दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेले दोघेही मरकझमध्ये सहभागी झाले होते. तेथून आणल्यापासून ते कर्मचार्यांचे ऐकत नाही. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या अन्य लोकांनाही धोका निर्माण होऊ शकतो,असेही फिर्यादीत म्हटले आहे.

    यापूर्वी दिल्लीतील रेल्वेच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवलेल्या तबलिगीच्या लोकांनी यापूर्वीही संतापजनक प्रकार केले होते. डॉक्टरांना शिवीगाळ, त्यांच्या अंगावर थुंकण्यासारखे प्रकार समोर आले होते.  राहण्याच्या ठिकाणी आजुबाजुला फिरणे, जेवणाच्या अवास्तव मागण्या असे प्रकारही करण्यात आले होते. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातही ठेवण्यात आलेल्या तबलिगींनी परिचारीकांसमोर कपडे बदलण्यासारखे संतापजनक प्रकार केले होते.

    मुंबईतही तबलिगी पोलीसांना सहकार्य करत नसल्याचे दिसून आले आहे. स्वत:हून पुढे येऊन उपचार करून घ्यावेत, असे आवाहन पोलीसांनी केले असूनही त्याला प्रतिसाद दिला नाही. तब्बल १५० जणांचा यामध्ये समावेश असून मुंबई महापालिकेने त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. मुंबईत आढळलेल्या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण हे तबलिगींच्या संपकार्तील असून इतर रुग्ण हे केवळ दहा टक्केच असल्याची माहिती महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिली आहे. त्यामुळे तबलिगींचा शोध लागणे महत्वाचे  आहे.

    Related posts

    पनवेलच्या फार्म हाऊसवर सलमान खानला चावला साप, बिनविषारी साप असल्याने बचावला

    ठाकरे – फडणवीस आणीबाणीवरून एकमेकांना भिडले; आणीबाणी लागू करणाऱ्या पक्षातले नेते हसले

    शेतकरी आंदोलनातील हेट स्पिचनंतर योगराज सिंग यांची काश्मीर फाईल्स सिनेमातून हकालपट्टी