अमेरिका, इटली, स्पेनसारख्या देशांमध्ये व्हायरसबाधित रुग्णांची देखभाल करण्यासाठी रुग्णालये उपलब्ध नाहीत. त्यामुळे मृत्यमुखी पडलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. भारत सरकारने मात्र या पातळीवर पूर्ण तयारी केली असून देशात १ लाखांवर बेड उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : अमेरिका, इटली, स्पेनसारख्या देशांमध्ये व्हायरसबाधित रुग्णांची देखभाल करण्यासाठी रुग्णालये उपलब्ध नाहीत. त्यामुळे मृत्यमुखी पडलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. भारत सरकारने मात्र या पातळीवर पूर्ण तयारी केली असून देशात १ लाखांवर बेड उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
देशातील चीनी व्हायरसग्रस्त रुग्णांची संख्या ९ हजारांवर पोहोचली आहे. मात्र, यातील ८० टक्के रुग्णांमध्ये कोविड-19ची अत्यंत सौम्य किंवा अगदी किरकोळ लक्षणे आहेत. त्यांच्यावर कोविड केअर सेंटर मध्ये उपचार केले जात आहेत. मध्यम स्वरुपाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर कोविडहेल्थ केअर सेंटर्स तर गंभीर रुग्णांवर कोविड रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.
व्हेंटिलेटरद्वारे आॅक्सिजनची गरज असणारे वा गंभीर स्वरूपाचे रुग्ण केवळ २० टक्के आहेत. या रुग्णांसाठी १,६७१ खाटांची गरज आहे. त्यांच्यावर उपचारासाठी सहाशेच्या वर रुग्णालयांत एक लाखापेक्षा जास्त खाटा (बेड) उपलब्ध आहेत. खासगी रुग्णालयांमध्येही कोविड- १९ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. त्याचबरोबर लष्करी रुग्णालयांतही उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. अ भारतीय रेल्वे २० हजार डब्यांचे रूपांतर अलगीकरण कक्षात करणार आहे, त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५ हजार डब्यांचे रुपांतरण पूर्ण झाले आहे. अरुणाचल प्रदेशात लष्कराच्या वतीने ५० विशेष वॉटरप्रूफ तंबू बनवले आहेत.