विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : घरगुती वापराच्या विनाअनुदानित १४.५ किलोच्या एलपीजी गँस सिलिंडरचे दर सरासरी ६३ रुपयांनी घटले आहेत. दर कमी होण्याचा हा सलग दुसरा महिना आहे. दिल्लीत ७४४, कोलकत्यात ७७४, तर मुंबईत ७१४ रुपयांना सिलिंडर आजपासून उपलब्ध होत आहे. चेन्नईत ७६१ रुपयांना सिलिंडर मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय इंधन बाजारत तेजी होती त्यामुळे सिलिंडर दरात १४१ रुपयांची मोठी वाढ झाली होती. पण आता दोनदा दर घटल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ही घट मध्यमवर्गासाठी सकारात्मक ठरली आहे.