कार्तिक कारंडे
नवी दिल्ली : आतापर्यंत आलेल्या दोन सर्वेक्षणामध्ये असं दिसतंय, की कोरोनाचे वैश्विक महासंकटाला ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी सरकार तोंड देत आहे, त्यावर जनता समाधानी आहे. अॅक्सिस या ख्यातनाम संस्थेच्या सर्वेक्षणामध्ये ८१ टक्के जनता मोदी सरकारवर समाधानी आहे आणि कोरोनाला पराभूत करेल, असेही जनतेला वाटते आहे. पण…
विरोधकांच्या मते, विशेषतः काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मते, मोदी सरकार ढिम्म राहिले. संकटाच्या तीव्रतेकडे मोदींनी दुर्लक्ष केले. स्वतः राहुल गांधी यांनी १२ फेब्रुवारीला ट्विट करून सरकारला कोरोनाच्या संकटाची कल्पना दिली होती. विरोधकांनी सोशल मीडियावर चालविलेल्या मोहिमेनुसार, मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केंद्र सरकारने काहीही न केल्याने देशावर ही गंभीर वेळ ओढविली आहे. खरोखरच केंद्र सरकार मार्चच्या पहिल्या आठवड्यात जागे झाले?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 12 फेब्रुवारीला कोरोना संकटाचा इशारा दिला होता.
विरोधकांचा हा आरोप तपासून पाहू या. उपलब्ध सार्वजनिक माहितीनुसार, प्रथमदर्शनी आरोपात तथ्य दिसत नाही. याउलट ७ जानेवारीला चीनमध्ये पहिला रूग्ण आढळल्याच्या दुसरयाच दिवशी केंद्रीय आरोग्य मंत्रालयात तज्ज्ञांची पहिली बैठक झाली होती आणि १७ जानेवारीपासून चीनमधून येणारया प्रवाशांची तपासणीदेखील सुरू झाल्याचे दिसते आहे. सोशल मीडिया, वर्तमानपत्रे, टीव्हीवरील बातम्या यांच्यावरून केंद्र सरकारने उचललेल्या पावलांची माहिती संकलित केली आहे.
त्याचा तारीखनिहाय तपशील पुढीलप्रमाणे मिळाला आहे…
० जानेवारी २०२०
- ७ जानेवारी : चीनमध्ये पहिला रूग्ण
- ८ जाने : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची तज्ज्ञांबरोबर पहिली बैठक
- १७ जाने : चीनमधून येणारया प्रवाशांची विमानतळांवर तपासणी सुरू
- २५ जाने : पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांनी घेतली उच्चस्तरीय आढावा बैठक
- ३० जाने : भारतात पहिला रूग्ण सापडला, चाचण्यांसाठी सहा प्रयोगशाळांची निश्चिती
- ३१ जाने : सहा विलगीकरण कक्ष (क्वारंनटाइम) सुरू
० फेब्रुवारी २०२०
- १ फेब्रु : परदेशात अडकलेल्या, विशेषतः चीनमध्ये, भारतीयांना देशात परत आणण्याचे काम चालू
- ३ फेब्रु : मंत्रिगटाची स्थापना, चीनमध्ये प्रवास न करण्याचा अधिकृत सल्ला, चीनचा ई-व्हिसा रद्द
- ७ फेब्रु : तिसरा रूग्ण सापडला, दीड लाखांच्या आसपास प्रवाशांची विमानतळावर तपासणी आणि सात हजार संशयितांची माहिती गोळा
- २२-२४ फेब्रु : सिंगापूर, व्हिएतनाम, नेपाळ, इंडोनेशिया, मलेशियांमधून येणारया प्रवाशांची तपासणी सुरू
- २४- २५ फेब्रु अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौरयावर
- २४ फेब्रुवारीपासून : दिल्लीमध्ये दंगल
- २६ फेब्रु : सिंगापूर, इटली, इराण व दक्षिण कोरियामध्ये प्रवास करण्यास निर्बंध
० मार्च २०२०
- ३ मार्च : सहावा रूग्ण सापडला, सर्वच देशांमधून येणारया प्रवाशांची तपासणी (यूनिर्व्हसल स्क्रीनिंग) चालू
- ४ मार्च : होली न खेळण्याचा पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहांचा निर्णय
- ७ मार्च : मोदींकडून उच्चस्तरीय बैठक. विलगीकरण आणि प्रवासांबाबत विविध निर्बंध व मार्गदर्शिका जारी
- १२ मार्च : रूग्णांची संख्या नव्वदपर्यंत पोहोचली. परिस्थिती गंभीर होत असल्याचे मोदींकडून ट्विट. बहुतेक व्हिसा रद्द.
- १४ मार्च : ५२ तपासणी केंद्रे सुरू
- १८ मार्च : परदेशांतून येणारया प्रत्येकांना क्वारंनटाइम बंधनकारक. बहुतेक राज्य सरकारांकडून शाळांना सुट्ट्या, विविध शासकीय कार्यालयांमधील कर्मचारयांच्या संख्येवर निर्बंध
- १९ मार्च : रूग्णांची संख्या दोनशेच्या आत असताना पंतप्रधानांचे देशाला उद्देशून भाषण. २२ मार्चला जनता कर्फ्युचे आवाहन. आर्थिक परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्सची स्थापन
- २१ मार्च : ७५ संवेदनशील जिल्ह्यांमध्ये लाॅकडाऊन लागू
- २२ मार्च : जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद. लोकल्स, रेल्वे, विमान, बसेस सेवा रद्द. आंतरराज्य प्रवेशावर निर्बंध.
- २३ मार्च : आठवड्याला पन्नास हजार चाचण्या करण्याची क्षमता विकसित
- २४ मार्च : पंतप्रधानांचे देशाला उद्देशून भाषण. २१ दिवसांचा राष्ट्रीय लाॅकडाऊन लागू.
- २५ मार्च : प्राप्तीकर, जीएसटी, निर्यातीसंदर्भात विविध सवलती जाहीर.
- २६ मार्च : १ लाख ७० हजार कोटींचे पंतप्रधान गरीब कल्याण योजना जाहीर.
- २७ मार्च : रिझर्व्ह बँकेकडून कर्जे स्वस्त, बँकांचे हफ्ते भरण्यासाठी तीन महिन्यांची मुदत जाहीर, बँकांनाही भांडवल उपलब्ध
- २८ मार्च : प्रत्येक आठवड्याला सत्तर हजार चाचण्या करण्याची क्षमता जगात सर्वाधिक
- २९ मार्च : लाॅकडाऊनमधून सर्वच वस्तूंची मालवाहतूक, वर्तमानपत्रे, दूध संकलन आदींना वगळले
- ३० मार्च : मोदींचे लाॅकडाऊन माॅडेल जगासाठी आदर्श असल्याची जागतिक आरोग्य संघटनेची प्रशंसा