वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतनात (पेन्शन) 20 टक्के कपात केल जाणार असल्याचे वृत्त “खोटे व निराधार” असल्याचे केंद्र सरकारने रविवारी स्पष्ट केले. असा कोणताही विचार सरकार करत नसल्याचा खुलासा केंद्र सरकारने दिला.
चिनी विषाणूने उभे केलेल्या संकटामुळे केंद्राचे अर्थकारण डगमगले आहे. त्यामुळे सरकारचा डोळा पेन्शनवर असल्याची अफवा जाणीवपूर्वक पसरवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून हा खुलासा करण्यात आला आहे.
वित्त मंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनात 20% कपात करण्याचे नियोजन केले जात असल्याची बातमी खोटी आहे. पेन्शन वितरणात कोणतीही कपात होणार नाही. एवढेच नव्हे तर पेन्शनसोबतच केंद्रीय पगारांव तसेच केंद्र सरकारच्या रोख व्यवस्थापनावर कोणाही परिणाम होणार नसल्याचे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे.
निवृत्ती वेतन व पेन्शनर्स कल्याण कल्याण विभागानेही अशा प्रकारच्या अफवा पेन्शनधारकांच्या चिंतेचे विषय बनल्या आहेत. मात्र त्यावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन केले आहे. “आधी स्पष्टीकरण दिल्याप्रमाणे, हे पुन्हा सांगितले जात आहे की पेन्शन कपातीसाठी असा कोणताही प्रस्ताव नाही आणि सरकारकडून या संदर्भात कोणत्याही कारवाईचा विचार केला जात नाही. त्याऐवजी पेन्शनधारकांच्या हितासाठी व सरकार कटीबद्ध आहे, ‘असे डीओपीपीडब्ल्यूने म्हटले आहे.