“इतक्या कमी कालावधीमध्ये पाच कोटी जणांनी हे अॅप डाऊनलोड करतात, हा प्रतिसाद अकल्पनीय आहे. असाच वेग व प्रतिसाद राहिला तर आम्ही किमान दहा कोटींचा पल्ला लवकरच गाठू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला जनता भरभरून प्रतिसाद देते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे..”
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्र सरकारने बनविलेले खास आरोग्य सेतू अॅपला केवळ बारा दिवसांमध्ये तब्बल पाच कोटी जणांनी डाऊनलोड केलेले आहे. कदाचित हे अॅप अत्यंत कमी कालावधीत जगामध्ये सर्वाधिक डाऊनलोड केलेले हे एकमेव अॅप आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इतक्या कमी कालावधीत पाच कोटी जणांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. एवढा जबरदस्त प्रतिसाद अकल्पनीय आहे. हाच वेग राहिला तर आम्ही किमान दहा कोटींचा पल्ला लवकरच गाठू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला जनता भरभरून प्रतिसाद देते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
मोदींनी जे सात आवाहने केली आहेत, त्यामध्ये आरोग्य सेतू डाऊनलोड करण्याचाही समावेश आहे. महिला बचत गट, अंगणवाडी कर्मचारी, गावागावांमधील माहिती सेवा केंद्रे यांच्याद्वारे सरकारकडून या अॅपला डाऊनलोड करण्यासा प्रोत्साहन मिळत आहे. भाजप कार्यकर्त्यांनीही या अॅपसाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत.
चीनी व्हायरसची जोखीम कितपत आहे, याबाबत आकलन करणारं हे अॅप नॅशनल इंफोममेटिक्स सेंटरने बनविले आहे. या अॅपमुळे कोविड-१९ संक्रमणाबाबत आकलन करणे आणि गरज वाटल्यास लोकांना सेल्फ आयसोलेशनबाबत सूचना देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना मदत होईल, असा हेतू या अॅपमागे आहे. त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे, कोरोनाबधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर तुम्हाला अलर्ट करण्याचं काम या अपद्वारे केलं जाणार आहे. हे अॅप युझरच्या फोनचे ब्लुटूथ, लोकेशन आणि मोबाईल नंबरचा उपयोग करून तो व्यक्ती कोरोना बाधितांच्या संपर्कात तर आला नाही ना? या गोष्टी शोधते. त्यामुळे हे अॅप कोरोनाच्या संसर्गांपासून बचाव करण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरते आहे.
चीनी व्हायरस विरोधातील या लढाईत जगभरात वेगवेगळे शोध लावले जात आहेत. देशात देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोरोनाविरोधात पूर्णपणे उतरले आहेत. COVID-19 ला ट्रॅक करण्यासाठी वेगवेगळे अॅप विकसित केले जात आहेत. नुकतेच केंद्र सरकारने कोरोना कवच नावाचं अॅप लॉन्च केलं होतं. आता आरोग्य सेतू नावाचं अॅप सरकारने लॉन्च केलं आहे. हे अॅप कोरोना ट्रेकर अॅप आहे. या माध्यमातून आपण घरबसल्या आपल्याला कोरोना आहे की नाही, हे तपासू शकता.
@narendramodi Respected Sir
— Javid Maqbool. (@javidmaqbool) April 14, 2020
Our CSCs/VLEs have Installed More than 20 thousand Aarogya Setu apps on Smart phones in District Kupwara J and K UT and are working on 24*7.
Regards,
CSC-SPV
Team Dist Kupwara J and K pic.twitter.com/bek1bF8Jo7
अॅपचा असा करा वापर…
- आरोग्य सेतू अॅप वापरण्यासाठी आपला फोन नंबर रजिस्टर करा.
- फोन नंबर टाकल्यावर एक ओटीपी येईल. जो इंटर केल्यावर अपमध्ये रजिस्ट्रेशन होईल.
- हे एक कोरोना व्हायरस ट्रॅकिंग अॅप आहे
- इंटर झाल्यानंतर अॅप आपल्याला ब्लूटूथ आणि जीपीएस अॅक्सेस विचारते.
- आपल्या डिव्हाईसमधून युझरचा डेटा अनक्रिप्टेड फॉर्ममध्ये घेतला जातो
- अॅप उघडल्यानंतर पर्सनल डिटेल्स विचारली जातात. यामध्ये जेंडर, नाव, वय, व्यवसाय आणि मागील 30 दिवसांच्या ट्रॅव्हल हिष्ट्रीबाबत विचारलं जातं. अर्थात या माहितीला आपण स्कीप देखील करू शकतो.
- यानंतर अॅपची भाषा निवडावी लागते
- अपमध्ये सर्व राज्यांमधील हेल्पलाईन नंबर्सची लिस्ट दिली आहे.
- आपल्याला वाटल्यास आपण या संकटकाळात स्वतःला स्वयंसेवक म्हणून रजिस्टर करू शकता.
- या अॅपमध्ये इस युझर चीनी व्हायरसचा आपल्याला किती धोका आहे, याचे सेल्फ असेसमेंट करू शकतात.
अशी आहेत खास वैशिष्ट्ये…
- आरोग्य सेतु अॅपमध्ये दोन खास फीचर्स आहेत. यात राज्यवार कोविड-19 हेल्पलाईन नंबर्सची लिस्ट दिली गेलीय.
- तसेच दुसरं म्हणजे सेल्फ असेसमेंट. या फिचरद्वारे आपण स्वतःची चाचणी करू शकतो. यातून तुम्हाला कोरोना धोका आहे की नाही हे लक्षात येण्यास मदत होते.
- जर तुमच्यामध्ये कोविड-19 ची काही लक्षणं असतील तर हे अप तुम्हाला सेल्फ आयसोलेशनसाठी निर्देश देतं.