• Download App
    मनी मॅटर्स : गुंतवणुकींचा आढावा वेळोवेळी घेऊन गरजेनुसार त्यात बदल करा। Money Matters: Review investments from time to time and make changes as needed

    मनी मॅटर्स : गुंतवणुकींचा आढावा वेळोवेळी घेऊन गरजेनुसार त्यात बदल करा

    आपल्याला पैसे कमी पडू नयेत, या भीतीने ग्रासलेल्या वरिष्ठ गुंतवणूकदारांना मल्टी लेवल मार्केटिंग स्कीम्स, पतपेढ्या, बेकायदेशीर कंपनी रोखे, बाग-बागायती इत्यादी पर्याय हमखास सुचवले जातात तर काहींना म्युच्युअल फंडांचे मागील परतावे भुरळ पाडतात. त्यात जर एजंट, वितरक किंवा सल्लागार हा परिचयाचा किंवा नात्यातला असेल, तर मग नाही म्हणणे जड होते. या सगळ्यामुळे निवृत्तीपश्चात चुकीचे पर्याय निवडले जातात. बरेच कमी वरिष्ठ गुंतवणूकदार माहिती काढून, कागदपत्रे वाचून, चार लोकांकडे चौकशी करून आणि गुंतवणुकीतील खाचखळगे समजून पैसे घालतात. Money Matters: Review investments from time to time and make changes as needed

    बाकीच्यांच्या बाबतीत मात्र सगळा विश्वासाचा खेळ होतो. आधी एजंटवर आणि मग देवावर! ही लूट जर थांबवायची असेल, तर काही बाबी नेहमी ध्यानात ठेवा. तुमचा पैसा ही सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे. त्यामुळे तुमचे निर्णय जाणीवपूर्वक घ्यायला हवे. मनात शंका असल्यास तिचे संपूर्ण निरसन झाल्याशिवाय गुंतवणूक करू नका. निवृत्तीच्या आधी दहा वर्षे आणि निवृत्तीनंतर कोणतेही मोठे कर्ज घेऊ नका.

    आपली जोखीम समजून त्यानुसार निवृत्ती नियोजन गुंतवणूक करा. दुसऱ्याने केली म्हणून नको. कुटुंबामध्ये एखाद्या सदस्याच्या विशेष गरजा असतील, तर तुमचे आणि तुमच्या पश्चात त्या व्यक्तीचे आर्थिक नियोजन करणे खूप गरजेचे आहे. निवृत्तीच्या आसपासचा काळ भावनिक असतो आणि म्हणून कधीतरी व्यवहाराचा विसर पडून तोटा होण्याची शक्यता असते. तेव्हा तुमची खरी गरज ओळखा. मुलांसाठी संपत्ती ठेवण्याआधी तुमच्या गरजा भागवा. एखादा चांगला, अनुभवी आणि प्रमाणित सल्लागार जवळ बाळगा.

    तुमचा निर्णय योग्य का अयोग्य, हे तो तुम्हाला पटवून देऊ शकतो. तुमच्या गुंतवणुकींचा आढावा वेळोवेळी घेऊन गरजेनुसार त्यात बदल करा. जवळ असलेल्या ध्येयासाठी जास्त जोखमीची गुंतवणूक बंद करून, दुसरा कमी जोखमीचा पर्याय निवडा. वाचा, चौकशी करा, प्रश्न विचारा, गुंतवणुकीतील खाचखळगे नीट समजून घ्या आणि पूर्ण समाधान झाल्यावरच पैसे गुंतवा. एवढे करूनही जर एखाद्याने तुम्हाला फसवले, तर योग्य ठिकाणी तक्रार करा. गुंतवणूक करताना ही चौकशी आधी करायची असते. इच्छापत्र आणि नामनिर्देशन करायलाच हवे. तसे न केल्यास, नंतर कौटुंबिक वाद होण्याची शक्यता वाढते.

    Money Matters : Review investments from time to time and make changes as needed

    Related posts

    येमेनजवळ अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयात खळबळ!

    WorldEconomicForum Davos : महाराष्ट्रात 1.37 लाख कोटींचे गुंतवणूक करार; 100000 रोजगार निर्मिती

    Indian economy : सरकारच्या उपाययोजनांची कमाल, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 9.2 टक्के, यापुढेही कायम राहणार वेग