RBI Governor Das : पतधोरण समितीने सर्वसंमतीने विकास कायम ठेवण्यासाठी समावेशक भूमिका घेऊन महागाई दराला निश्चित दरावर ठेवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणाले की, देशांतर्गत अर्थव्यवस्थेचे कोरोना विषाणूचा प्रसार रोखणे आणि आर्थिक विकास टिकविण्याचे लक्ष्य आहे. Local lockdowns also have a serious impact on the economy, says RBI Governor Das
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पतधोरण समितीने सर्वसंमतीने विकास कायम ठेवण्यासाठी समावेशक भूमिका घेऊन महागाई दराला निश्चित दरावर ठेवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणाले की, देशांतर्गत अर्थव्यवस्थेचे कोरोना विषाणूचा प्रसार रोखणे आणि आर्थिक विकास टिकविण्याचे लक्ष्य आहे.
एमपीसीने म्हटले आहे की, 2021 मध्ये अन्नधान्याचे बंपर उत्पादन झाले असून धान्याच्या किमतीत घट दिसून येईल. आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, नुकत्याच झालेल्या संसर्गातील वाढीमुळे आऊटलुक जास्त अनिश्चित झाला आहे. ते म्हणाले की, स्थानिक लॉकडाऊनमुळे मागणी आणि पुरवठ्यात झालेल्या सुधारणांवर परिणाम होऊ शकतो आणि अर्थव्यवस्था नॉर्मल होण्यासाठी आणखी उशीर होऊ शकतो.
समितीने कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली आहे, परंतु लसीकरण मोहिमेमुळे विकासदराला चालना मिळण्याचेही म्हटले आहे.
तज्ज्ञांच्या मते, महागाईत वाढ, कोरोना रुग्णसंख्येतील वाढ आणि देशातील काही भागांतील स्थानिक लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय नाणे निधीने मंगळवारी चीनच्या तुलनेत 2021 मध्ये भारतासाठी 12.5 टक्के वाढीचा अंदाज वर्तविला आहे. याशिवाय जागतिक बँकेच्या वार्षिक स्प्रिंग बैठकीपूर्वीच्या वार्षिक विश्व आर्थिक आऊटलूकमध्ये म्हटलेय की, 2022 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 6.9 टक्क्यांनी वाढू शकते.
Local lockdowns also have a serious impact on the economy, says RBI Governor Das
महत्त्वाच्या बातम्या
- Mask Mandatory While Driving : कारमध्ये एकट्या व्यक्तीनेही मास्क घालणे बंधनकारक, दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
- कोरोना रुग्णसंख्येने मोडले पुन्हा सर्व रेकॉर्ड, 24 तासांत 1 लाख 15 हजार नवीन रुग्णांची नोंद, जगात सर्वाधिक आकडा
- RBI Credit Policy : व्याजदरांमध्ये कोणताही बदल नाही, RBIचा 10.5% जीडीपी ग्रोथचा अंदाज
- वसुली प्रकरणात देशमुखांच्या बचावात उतरली शिवसेना, विरोधकांवर ‘सामना’तून टोलेबाजी, येडियुरप्पांचं दिलं उदाहरण
- आमने-सामने : मोईन अलीबाबत लेखिका तस्लीमा नसरीन यांचे वादग्रस्त ट्विट जोफ्रा आर्चर भडकला