महत्वाच्या संकटकाळात उपयोगी ठरणारा इमर्जन्सी फंड कसा जमवावा याची अनेकांना माहिती नसते. इमर्जन्सी फंड जमावण्याआधी तो किती असावा हे माहिती असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी महिन्याला किती खर्च लागतो ते आपण पाहावे. यात कर्जाचे हप्ते, मुलांच्या शिक्षणाचा खर्च पकडावे, तसेच जो वार्षिक खर्च लागतो त्यास बाराने भागून महिना किती खर्च येतो ते काढावे. How to raise an emergency fund?
महिन्याचा खर्च समजला कि त्यास ३ ते ६ ह्या अंकाने गुणावे म्हणजे ३ ते ६ महिने पुरेल एवढी रक्कम आपल्या कडे जमा असावी. ज्यांचा उद्योग व्यवसाय आहे किंवा उत्पन्न हे अनियमित आहे अशांनी सहा महिने तर इतरांनी ३ ते ६ महिने आपापल्या उत्पन्नाच्या किंवा नोकरीच्या अनिश्चिततेच्या मानाने ही रक्कम किती येते हे मोजावे.
म्हणजे समजा एक नोकरी गेली किंवा सोडावी लागली तर दुसरी किती दिवसात मिळेल ह्या अंदाजाने किती महिन्याचा इमर्जन्सी फंड असावा हे काढावे. त्यानंतर हे उद्दिष्ट समोर ठेवून तो कसा आणि कुठे जमवावा हे पहावे. आज प्रत्येकाकडे एक पेक्षा अधिक बँक खाते आहे.
सहा माहिन्यांपैकी, एक महिन्याचा इमर्जन्सी फंड हा एक किंवा दोन बँक खात्यात विभागून जमा करावा. ही खाती आपल्या सॅलरी अकाउंट पेक्षा वेगळी असणे गरजेचे आहे. अशा बँक खात्यातून आपल्यास एटीएम द्वारे किंवा नेटबँकिंग द्वारे पैसे जेव्हा हवे तेव्हा लगेच मिळतील. उरलेल्या २ ते ५ महिन्याचा इमर्जन्सी फंड हा लिक्विड म्युच्युअल फंड मध्ये ठेवावा.
लिक्विड म्युच्युअल फंड हे सर्वात कमी जोखमीचे फंड असतात. त्यात आपल्यास परतावा हा पाच ते सात टक्के वार्षिक दरा पर्यंत मिळू शकतो. एकरकमी मिळालेले उत्पन्न किंवा बोनस किंवा बक्षीस, किंवा जुन्या वस्तू विकून आलेली रक्कम ई. मधील काही रक्कम ही इमर्जन्सी फंड कडे वळती करावी. अशा प्रकारे आपण इमर्जन्सी फंड जमा करून भविष्यात येणाऱ्या अनिश्चिततेवर मात करू शकता.
How to raise an emergency fund?
महत्त्वाच्या बातम्या
- मेहुल चोकसीला भारतात आणण्यासाठी डोमिनिकामध्ये आहेत सीबीआयच्या या डॅशिंग महिला अधिकारी
- राहुल गांधींनी एका दिवसात ट्विटरवरून अनेक नेत्यांना – पत्रकारांना केले अनफॉलो
- Corona Vaccines : फायझर आणि मॉडर्नासारख्या परदेशी लसींना भारतात प्रवेशाचा मार्ग मोकळा, ट्रायलची गरज नाही
- मुंबईतील CSMT स्थानकाच्या पुनर्विकासाच्या करारासाठी अदानी रेल्वेसह नऊ कंपन्या स्पर्धेत