SWAMIH : केंद्राच्या निधीच्या माध्यमातून पूर्ण होणाऱ्या पहिल्या गृहप्रकल्पाचे उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या हस्ते लाभार्थींना हस्तांतरण होणार आहे. हा प्रकल्प मुंबईच्या रिवळी पार्क मध्ये स्थित आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन माध्यमातूनच हा कार्यक्रम होणार आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्रालयाने ट्वीटरवर माहिती दिली. मध्यम उत्पन्न गटासाठी परवडणारी घरेच्या विशेष खिडकी योजनेंतर्गत हा पूर्ण होणारा हा पहिला प्रकल्प आहे. Govt Funded first SWAMIH project Completed in Rivali Park Mumbai, FM sitharaman will handover the keys to the homebuyers in online ceremony
विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्राच्या निधीच्या माध्यमातून पूर्ण होणाऱ्या पहिल्या गृहप्रकल्पाचे उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या हस्ते लाभार्थींना हस्तांतरण होणार आहे. हा प्रकल्प मुंबईच्या रिवळी पार्क मध्ये स्थित आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन माध्यमातूनच हा कार्यक्रम होणार आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्रालयाने ट्वीटरवर माहिती दिली. मध्यम उत्पन्न गटासाठी परवडणारी घरेच्या विशेष खिडकी योजनेंतर्गत हा पूर्ण होणारा हा पहिला प्रकल्प आहे.
सन 2019 पासूनच रिअल इस्टेट क्षेत्राला अनेक कारणांमुळे प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत होता. यामुळे अनेक गृहनिर्माण प्रकल्प रखडलेले होते. अशा वेळी या क्षेत्राला तत्काळ मदतीची गरज होती. यामुळे केंद्राने SWAMIH म्हणजे स्पेशल विंडो फॉर फंडिंग स्टाल्ड अफॉर्डेबल अँड मिडल इन्कम हाउसिंग प्रोगामची सुरुवात केली. या गुंतवणूक निधीचे मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले.
SWAMIH निधीचा उद्देश हा केंद्राने निश्चित केलेले मापदंड पूर्ण करणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांना 25 हजार कोटी रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य करण्याचा आहे. कारण हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर या क्षेत्रात विक्रीला चालना मिळून रोखीमध्ये वाढ होणार आहे.
तथापि, कोरोना महामारीमुळे या क्षेत्राला आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला खोल संकटात ढकलले होते. स्वत:चे हक्काचे घर असावे याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो खरेदीदारांमध्ये निराशा आलेली होती. अशावेळी रिअल इस्टेट क्षेत्राला पुन्हा उभारी देण्याचे काम केले. केंद्राच्या या निधीमुळे या क्षेत्रात तब्बल 5 कोटी रोजगाराचेही उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही योजना राष्ट्रीय पातळीवर 250 हून जास्त सहायक उद्योगांशी जोडलेली आहे.
Govt Funded first SWAMIH project Completed in Rivali Park Mumbai, FM sitharaman will handover the keys to the homebuyers in online ceremony
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची ८ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी बैठक; लस केव्हा, किती मिळणार याची सविस्तर दिली माहिती
- आत्मनिर्भर भारत : आता भारतातच बनणार इलेक्ट्रिक कारची बॅटरी, मोदी मंत्रिमंडळाची 18100 कोटींच्या PLIला मंजुरी
- मोठा निर्णय : DRDOच्या ऑक्सिकेयर सिस्टिम खरेदीला पीएम केअर्स फंडची मंजुरी, दीड लाख युनिटची करणार खरेदी
- मूडीजने घटवला भारताचा जीडीपी वाढीचा दर, जूननंतर अर्थव्यवस्था पुन्हा बहरण्याचे भाकीत
- देशात आणीबाणी लागू करण्यासाठी केंद्राला निर्देश देण्याची याचिकेद्वारे मागणी, मद्रास हायकोर्टाने फेटाळली