Edible Oil Price : देशातील खाद्य तेलांच्या आयात शुल्काच्या कपात करण्याच्या खोट्या अफवांमुळे परदेशी बाजारपेठेत घसरण वाढत चालली आहे आणि दिल्ली तेलबिया बाजारात शुक्रवारी सोयाबीन आणि सीपीओ आणि पामोलिन तेलाच्या किंमती खाली आल्या. इतर तेलबियांच्या किमती मागील स्तरावर बंद झाल्या. Edible oil price likely to fall soon as international rate dips due to rumor
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशातील खाद्य तेलांच्या आयात शुल्काच्या कपात करण्याच्या खोट्या अफवांमुळे परदेशी बाजारपेठेत घसरण वाढत चालली आहे आणि दिल्ली तेलबिया बाजारात शुक्रवारी सोयाबीन आणि सीपीओ आणि पामोलिन तेलाच्या किंमती खाली आल्या. इतर तेलबियांच्या किमती मागील स्तरावर बंद झाल्या. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, अफवांच्या चुकीच्या माहितीमुळे मलेशिया एक्स्चेंजमध्ये गुरुवारी रात्रीच्या तुलनेत दीड टक्क्यांनी आणि शिकागो एक्स्चेंजमध्ये चार टक्क्यांनी घसरण झाली, ज्याचा थेट परिणाम देशांतर्गत व्यवसायावरही झाला. हे लक्षात घेण्याजोगे आहे की, देशातील खाद्य तेलाची कमतरता भागविण्यासाठी प्रामुख्याने सीपीओ आणि सोयाबीन डीगम मोठ्या प्रमाणात आयात केले जातात. याच कारणास्तव परदेशातील घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीन व सीपीओ तेलाच्या किंमती खाली आल्या आहेत. अन्न सचिव सुधांशु पांडे यांनी गुरुवारी सांगितले की, स्वयंपाकाच्या तेलाच्या किंमती खाली येण्याचा ट्रेंड दिसून येत आहे. डिसेंबरपर्यंत फ्युचर्स मार्केटमध्ये भाव घसरण्याचा ट्रेंड आहे. ते म्हणाले की, तेल आणि डाळींच्या किंमतींवर सरकार लक्ष ठेवून आहे.
तेल आणि डाळींचे भाव
28 मे च्या दराविषयी बोलताना ग्राहक व्यवहार विभागाने जाहीर केलेल्या दराच्या यादीनुसार वनस्पती तेलाची किंमत प्रति किलो 124 रुपये, सोयाबीन तेल 142 रुपये, शेंगदाणा तेलाची किंमत 173 रुपये प्रति किलो होती. खाद्य तेलाच्या किंमतीत 50 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. दुसरीकडे डाळींबद्दल बोलायचे झाले तर मसूर डाळीची किंमत 82 रुपये, हरभऱ्याची डाळ 78 रुपये, तूर डाळ 107 रुपये, उडीद डाळ 103 रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. वार्षिक आधारावर डाळींच्या किंमतीत 10-20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
अफवांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते
सोयाबीनची पेरणी व कापणीच्या वेळी अशा अफवांमुळे तेलबिया व्यवसायाचे आणि विशेषत: शेतकर्यांचे नुकसान होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. अफवा पसरवणारे असेच लोक आहेत ज्यांचे मलेशिया आणि अर्जेंटिना येथे प्रक्रिया प्रकल्प आहेत आणि तेलबियाच्या उत्पादनात देश स्वावलंबी होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे.
Edible oil price likely to fall soon as international rate dips due to rumor
महत्त्वाच्या बातम्या
- कोटक महिंद्रा समूहाची मोठी घोषणा, कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना 2 वर्षांपर्यंत वेतन आणि विम्याचा लाभ
- ग्राहकांचा डेटा वापरल्याबद्दल यूके आणि युरोपियन युनियनकडून फेसबुकविरुद्ध तपास सुरू
- नायजेरियात ट्विटर अनिश्चित काळासाठी निलंबित, राष्ट्राध्यक्षांचे अकाउंट फ्रिज केल्याने सरकारची कारवाई
- अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांचे फेसबुक खाते 2 वर्षांसाठी निलंबित; ट्रम्प म्हणाले, हा 75 दशलक्ष लोकांचा अपमान
- ‘हाथी मेरे साथी’, माहुताला अखेरचा निरोप देणाऱ्या हत्तीचा व्हिडिओ व्हायरल, डोळे पाणावणारा प्रसंग