• Download App
    Goldman Sachs : कोरोनाचा परिणाम, गोल्डमन सॅक्सने घटवला भारताच्या जीडीपी वाढीच्या अंदाज । Corona Impact on Economy, Goldman Sachs downgraded India's GDP growth forecast

    Goldman Sachs : कोरोनाचा परिणाम, गोल्डमन सॅक्सने घटवला भारताच्या जीडीपी वाढीच्या अंदाज

    Goldman Sachs : कोरोनाची दुसरी लाट देशाच्या अर्थव्यवस्थेलाही अडचणीत टाकताना दिसत आहे. अमेरिकी ब्रोकरेज कंपनी गोल्डमॅन सॅक्सने (Goldman Sachs) चालू आर्थिक वर्ष 2021-22 साठी भारताचा वृद्धि दराचा अंदाज 10.9 टक्क्यांवरून घटवून 10.5 टक्के केला आहे. ब्रोकरेजने शेअर बाजार आणि उत्पन्नाच्या आपल्या अंदाजातही घट दर्शवली आहे. Corona Impact on Economy, Goldman Sachs downgraded India’s GDP growth forecast


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरोनाची दुसरी लाट देशाच्या अर्थव्यवस्थेलाही अडचणीत टाकताना दिसत आहे. अमेरिकी ब्रोकरेज कंपनी गोल्डमॅन सॅक्सने (Goldman Sachs) चालू आर्थिक वर्ष 2021-22 साठी भारताचा वृद्धि दराचा अंदाज 10.9 टक्क्यांवरून घटवून 10.5 टक्के केला आहे. ब्रोकरेजने शेअर बाजार आणि उत्पन्नाच्या आपल्या अंदाजातही घट दर्शवली आहे.

    भारतात कोरोनाचे दररोज रेकॉर्डब्रेक रुग्ण आढळत आहेत. विविध राज्यांमध्ये लॉकडाऊनसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात एका दिवसात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू आणि बिहार यासारख्या प्रमुख राज्यांनी कठोर निर्बंध लावले आहेत. हे निर्बंध पुढेही सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    गोल्डमन सॅक्सने असाही अंदाज वर्तवला आहे की, निफ्टी डिसेंबरपर्यंत 16,300 पर्यंत पोहोचेल. यापूर्वी या एजन्सीने निफ्टी 16,500 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

    गोल्डमन सॅक्सच्या अर्थतज्ज्ञांनी मंगळवारी जारी केलेल्या विस्तृत अहवालात म्हटले की, महामारीची रुग्णसंख्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याने तसेच अनेक राज्यांत कडक निर्बंधांमुळे जीडीपी वृद्धीदराबद्दल चिंता निर्माण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदार अर्थव्यवस्था आणि उत्पन्नातील सुधारणेमुळे चिंतित आहेत.

    जून तिमाहीच्या वाढीवर प्रभाव

    वृत्तसंस्था पीटीआयनुसार, गोल्डमन सॅक्सच्या टिपणानुसार, शेअर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. निफ्टीत सोमवारी 3.5 टक्क्यांचे नुकसान झाले. गोल्डमन सॅक्सने दुसऱ्या म्हणजेच जून तिमाहीच्या वाढीच्या अंदाजांनाही कमी केले आहे.

    तथापि, या तिमाहीचा कोणताही आकडा दिलेला नाही. ब्रोकरेज फर्मने आपल्या टिपणात विश्वास व्यक्त केलाय की, या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम हा किरकोळ असेल, कारण हे निर्बंध केवळ काही क्षेत्रांपुरतेच मर्यादित आहेत.

    Corona Impact on Economy, Goldman Sachs downgraded India’s GDP growth forecast

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र