• Download App
    SBI आणि HDFC बँकेत आज रात्री बंद राहणार या सेवा, दिवसाच उरकून घ्या महत्त्वाची कामे । Alert For Bank Customers, SBI And HDFC Bank Servises Will Not availabel During Night today

    Alert For Bank Customers : SBI आणि HDFC बँकेच्या या सेवा आज रात्री राहणार बंद, दिवसाच उरकून घ्या महत्त्वाची कामे

    Alert For Bank Customers : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि खासगी क्षेत्रातील एचडीएफसीने आपल्या ग्राहकांसाठी सूचना जारी केली आहे. यानुसार या दोन्ही बँकांच्या अनेक सेवा रात्री काही काळासाठी बंद राहतील. दोन्ही बँकांनी आपल्या कोट्यवधी ग्राहकांना अलर्ट जारी करत ही माहिती दिली आहे. यामुळे जर तुमचे नेटबँकिंग, यूपीआयशी संबंधित काही काम असेल तर ते दिवसाच उरकून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. Alert For Bank Customers, SBI And HDFC Bank Services Will Not available During Night today


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि खासगी क्षेत्रातील एचडीएफसीने आपल्या ग्राहकांसाठी सूचना जारी केली आहे. यानुसार या दोन्ही बँकांच्या अनेक सेवा रात्री काही काळासाठी बंद राहतील. दोन्ही बँकांनी आपल्या कोट्यवधी ग्राहकांना अलर्ट जारी करत ही माहिती दिली आहे. यामुळे जर तुमचे नेटबँकिंग, यूपीआयशी संबंधित काही काम असेल तर ते दिवसाच उरकून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

    SBI ने ट्विट करून दिली माहिती

    देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBIने म्हटलेय की, 7 मे रोजी रात्री 10:15 वाजेपासून ते 8 मे पहाटे 1:45 वाजेपर्यंत बँकेच्या मेंटेनन्सचे काम होईल. बँकेच म्हणणे आहे की, यादरम्यान एसबीआय ग्राहकांना INB/YONO/YONO Lite/UPI सर्व्हिसेसचा वापर करता येणार नाही.

    SBIने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. बँकेचे म्हणणे आहे की, कस्टमर एक्स्पीरिएंस चांगला करण्यासाठी हे काम केले जात आहे.

    एचडीएफसीनेही जारी केला अलर्ट

    खासगी क्षेत्रातील दिग्गज एचडीएफसी बँकेनीही आपल्या ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. बँकेने म्हटले की, त्यांच्या नेटबँकिंग आणि मोबाइल बँकिंग सेवा शुक्रवारी रात्री बाधित राहतील.

    बँकेतून ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या एका Email संदेशात म्हटलेय की, काही निश्चित मेंटेनन्स एक्टिव्हटीमुळे 8 मे पहाटे 2 वाजेपासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत नेटबँकिंग आणि मोबाइल बँकिंग सेवा उपलब्ध नसतील. असुविधेसाठी खेद आहे.’

    एचडीएफसी बँक भारतातील खासगी क्षेत्रातील दिग्गज बँक आहे. आपल्या ग्राहकांना सातत्याने चांगल्या सेवा देण्यासाठी प्रयत्न करत आहे. इंटरनेट सेवांमध्ये अनेक अडथळे यापूर्वी आले होते, यामुळे बँक वेळोवेळी दुरुस्तीचे काम करते.

    Alert For Bank Customers, SBI And HDFC Bank Servises Will Not availabel During Night today

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य