तटकरे म्हणतात, दोन डिसेंबर नंतर सुद्धा राष्ट्रवादीची भाजपलाच साथ; त्यांना दुसरा पर्याय तरी आहे का??
राज्यातल्या नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुकांचे मतदान 2 डिसेंबरला होईल. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याचे भाकीत अनेकांनी वर्तविले. दोन डिसेंबर पर्यंत आम्हाला युती टिकवायची आहे असे वक्तव्य भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.