नेहरूंचे राजकीय कर्तृत्व, प्रतिमा निर्मिती आणि विरोधकांची अति तात्त्विक सुमार कामगिरी!!
भारतातल्या आजकालच्या सगळ्याच समस्यांचे ओझे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या खांद्यावर टाकायची आजकालची “फॅशन” असताना प्रत्यक्षात नेहरू काळ नेहरूंचे राजकीय कर्तृत्व, प्रतिमा निर्मिती आणि त्याला कारणीभूत ठरलेली विरोधकांची अति तात्त्विक सुमार कामगिरी याचा आढावा पंडित नेहरूंच्या पुण्यतिथीच्या दिवशी घेतला, तर तो वावगा ठरणार नाही.