भाजपने अजितदादांना सत्तेच्या वळचणीला घेऊन पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये सुमडीत कोंबडी कापली!!
महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निकालात आश्चर्यकारक असे काहीच घडले नाही मुंबईत ठाकरे बंधूंची सत्ता गेली, तर पुण्यात आणि पिंपरी चिंचवड मध्ये अजितदादांच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. ठाकरे बंधू आणि पवार काका पुतणे हे निवडणुकीच्या साठी एकत्र आले पण प्रत्यक्षात त्यांना पराभवाचेच तोंड पाहावे लागले.