दक्षिण – पश्चिम महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंचा झंझावात; पवारांच्या राष्ट्रवादीने रिकाम्या केलेल्या political space मध्ये शिरकाव!!
दक्षिण पश्चिम महाराष्ट्र एकेकाळी शरद पवारांचा बालेकिल्ला होता. सांगली जिल्ह्यात काही प्रमाणात काँग्रेसची ताकद होती. पण नगरपरिषदा आणि नगरपंचायत यांच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रातून फारसा प्रतिसादच मिळाला नाही. पवारांनी सुद्धा या निवडणुकीतला रस काढून घेतला त्यामुळे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात एक मोठी पॉलिटिकल स्पेस निर्माण झाली त्या पॉलिटिकल स्पेस मध्ये बाकी कुठल्याही पक्षापेक्षा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जास्त शिरकाव केल्याचे चित्र समोर आले.