Tamil Nadu : अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी; तामिळनाडूहून आला ई-मेल, शोध मोहीम सुरू
अयोध्येतील राम मंदिरावर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. १४ एप्रिल (सोमवार) रात्री राम जन्मभूमी ट्रस्टकडून एक ई-मेल आला. त्यात लिहिले आहे- मंदिराची सुरक्षा वाढवा. ट्रस्टचे अकाउंट ऑफिसर महेश कुमार यांनी मंगळवारी सायबर सेलमध्ये या संदर्भात तक्रार दाखल केली आहे.