Kashmir : काश्मीरमधील हल्ल्यानंतर आतापर्यंत महाराष्ट्रातील 500 पर्यटक राज्यात दाखल
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्य सरकारच्या वतीने विशेष विमानांची व्यवस्था केली जात आहे. 232 पर्यटकांना घेऊन इंडिगोचे तिसरे विशेष विमान आज दुपारी श्रीनगर येथून निघेल आणि सायंकाळी मुंबईत पोहोचेल. काल दोन विशेष विमानांनी 184 पर्यटक मुंबईत पोहोचले होते. सुमारे 500 पर्यटक आतापर्यंत परतले आहेत