Amit Shah : ‘भारताची अर्थव्यवस्था अशा दबावाला तोंड देण्यास सक्षम ‘
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरात गोंधळ उडाला आहे. बहुतेक देशांचे शेअर बाजार कोसळले आहेत. दरम्यान, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे एक मोठे विधान समोर आले आहे. ते म्हणाले की जागतिक अनिश्चितता असूनही, आपली देशांतर्गत अर्थव्यवस्था मजबूत आहे. बाह्य दबावामुळे भारतातील नागरिकांना काळजी करण्याची गरज नाही. भारताची अर्थव्यवस्था अशा दबावाला तोंड देण्यास सक्षम आहे.