Gujarat : गुजरातच्या इतिहासातील सर्वात मोठी बुलडोझर कारवाई!
गुजरातच्या अहमदाबाद महानगरपालिकेने मंगळवारी (२९ एप्रिल) बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध मोठी मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत, एएमसीने चांदोला तलावाजवळील बेकायदेशीर वस्त्या पाडल्या. या मोहिमेबाबत सह पोलिस आयुक्त (गुन्हे) शरद सिंघल म्हणाले की, बहुतांश बांगलादेशी डोला तलाव परिसरात राहतात.