Mohan Bhagwat : ‘ही धर्म आणि अधर्माची लढाई आहे’, पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर मोहन भागवत यांचे विधान!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर म्हटले आहे की, ही कोणत्याही पंथाची किंवा समुदायाची लढाई नाही. सध्या सुरू असलेला संघर्ष हा धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्ष आहे. मुंबईत पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या ८३ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देताना त्यांनी हे सांगितले.