PM Modi : पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदींनी रद्द केला रशिया दौरा
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत निर्माण झालेल्या तणावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशिया दौरा रद्द करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी ९ मे रोजी मॉस्कोमध्ये होणाऱ्या विजय दिनाच्या समारंभाला उपस्थित राहणार नाहीत. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी ही माहिती दिली आहे.