Bengaluru : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई, RCBचा मार्केटिंग हेड अटक
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. त्याअंतर्गत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मार्केटिंग हेड निखिल सोसाळे यांना अटक करण्यात आली आहे. तो मुंबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. तथापि, तो विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याशिवाय इतर तीन जणांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या बंगळुरू पोलिस चौकशी करत आहेत. बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.