Pakistan Mock drill : पाकसोबतच्या तणावादरम्यान केंद्राचा मोठा निर्णय; 7 मे रोजी मॉक ड्रिलचे आदेश
पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने अनेक राज्यांना ७ मे रोजी मॉक ड्रिल करण्यास सांगितले आहे. यामध्ये, नागरिकांना हल्ल्यादरम्यान स्वतःचे संरक्षण करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. युद्धाच्या परिस्थितीत लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे केले जात आहे.