धमकी पासून विनंती पर्यंत पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या तोंडी आले पाणी!!
Operation sindoor च्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सैन्याने आणि पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी पाकिस्तानचा विजय झाल्याचे कितीही आव आणले असले
Operation sindoor च्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सैन्याने आणि पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी पाकिस्तानचा विजय झाल्याचे कितीही आव आणले असले
सर्वोच्च न्यायालयात वक्फ सुधारणा कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 3 दिवसांची सुनावणी पूर्ण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी तीन मुद्द्यांवर आपला अंतरिम आदेश राखून ठेवला. यामध्ये ‘न्यायालयांद्वारे वक्फ, वक्फ बाय युझर किंवा वक्फ बाय डीड’ घोषित केलेल्या मालमत्ता डी-नोटिफाय करण्याचा अधिकारदेखील समाविष्ट आहे.
उत्तर प्रदेशात बुधवारी संध्याकाळी अचानक हवामान बदलले. त्यानंतर, राज्यातील अनेक भागात वादळ आणि मुसळधार पाऊस पडला. या वादळामुळे उत्तर प्रदेशात प्रचंड हाहाकार माजला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी वादळ आणि हवामानाशी संबंधित घटनांमध्ये २० जणांचा मृत्यू झाला. तर सुमारे १०० घरांना आग लागली. या काळात काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला. पण जीवित आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर ड्रोन उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे. पुढील दीड वर्षात भारतीय ड्रोन कंपन्यांना लष्कर आणि संरक्षण विभागाकडून किमान ४००० कोटी रुपयांचे ड्रोन उत्पादन ऑर्डर मिळण्याची अपेक्षा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थान मधल्या बिकानेर मधून पाकिस्तानला इशारा दिला ही बातमी आता जुनी झाली, पण त्यांनी तिथून चीनलाही ललकारले, ही बातमी खरी आणि नवी आहे.
इस्रोचे प्रमुख डॉ व्ही नारायणन यांनी ओडिशामधील सेंट्रल टूल रूम आणि ट्रेनिंग सेंटर (CTTC) येथे चांद्रयान-४ आणि चांद्रयान-५ ची घोषणा केली. इस्रो प्रमुखांनी सांगितले आहे की चांद्रयान-४ चा उद्देश चंद्राचे नमुने गोळा करणे आणि ते पृथ्वीवर परत आणणे आहे, तर चांद्रयान-५ हे जपानसोबतचे सहयोगी अभियान आहे.
भारतात पुन्हा एकदा कोरोनाने (कोविड-१९) हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. त्याची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. आतापर्यंत ११ राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर EDच्या रडारवर आहेत. EDची टीम गृहमंत्र्यांशी संबंधित संस्थांपर्यंत पोहोचली होती. कन्नड अभिनेत्री राण्या राव आणि इतरांविरुद्ध सोन्याच्या तस्करीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांच्याशी संबंधित ठिकाणांवर EDचे छापे सुरू आहेत.
दहशतवादाशी लढण्यासाठी भारताच्या दृष्टिकोनाची रूपरेषा सांगताना, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे की ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू आहे कारण पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासारखा दुसरा हल्ला झाल्यास भारत प्रत्युत्तर देईल आणि जर तेथून दहशतवादी कारवाया केल्या जात असतील तर पाकिस्तानला लक्ष्य केले जाईल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आपण शस्त्रसंधी घडवून आणल्याचे डोनाल्ड ट्रम्प आठ वेळा बोलल्याचे काँग्रेसला दिसले, पण नरेंद्र मोदींनी त्यांना पुरते कोलले, हे मात्र काँग्रेसला का दिसू शकले नाही??, हा सवाल जयराम रमेश यांच्या वक्तव्यानंतर समोर आला.
रोख रकमेच्या प्रकरणात अडकलेले अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी करणारी याचिका बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, हे प्रकरण पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे आहे. तुम्ही आधी जाऊन त्यांच्याकडे अपील करावे. मग आमच्याकडे या.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानशी चर्चेचे सगळेच प्रस्ताव धुडकावल्यानंतरही पाकिस्तानी पंतप्रधान सौदी अरेबियात “शोधताहेत” चर्चेसाठी “तटस्थ” जागा!! अशी वेळ पाकिस्तानवर आली आहे.
एका महिला अधिकाऱ्याला कायमस्वरूपी कमिशन न दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नौदलाला कडक शब्दांत फटकारले. न्यायालयाने नौदलाच्या अधिकाऱ्यांना सांगितले की आता पुरे झाले, त्यांनी आपला अहंकार सोडून द्यावा आणि आपले मार्ग सुधारावेत.
भारतीय लेखिका, वकील आणि कार्यकर्त्या बानू मुश्ताक यांनी त्यांच्या ‘हार्ट लॅम्प’ या पुस्तकासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकून इतिहास रचला आहे. हार्ट लॅम्प हे बुकर पारितोषिक मिळवणारे कन्नड भाषेतील पहिले पुस्तक आहे. दीपा भाष्टी यांनी त्याचा इंग्रजीत अनुवाद केला आहे.
वक्फ सुधारणा कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी करत आहे. केंद्र सरकारतर्फे उपस्थित असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, आम्ही एक जुनी समस्या सोडवत आहोत जी १९२३ पासून सुरू झाली आहे.
भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) बीआर गवई यांनी बुधवारी सांगितले की, वकिलांना सुट्टीच्या काळात काम करायचे नसते परंतु खटल्यांच्या वाढत्या प्रलंबिततेसाठी न्यायाधीशांना जबाबदार धरले जाते. खरंतर, सरन्यायाधीश गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठासमोर एका खटल्याची सुनावणी सुरू होती. मग एका वकिलाने उन्हाळी सुट्ट्यांनंतर त्याच्या याचिकेवर सुनावणी करण्याची मागणी केली.
भारताने जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) व्यासपीठावरून पाकिस्तानवर थेट आणि तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. “पाकिस्तान हा जिहादी दहशतवादाचा केंद्रबिंदू आहे. तेथेच दहशतवादाचे बीज पेरले जाते आणि जगापुढे मात्र स्वतःला पीडित म्हणून सादर केले जाते,” अशी खरमरीत टीका भारताच्या स्थायी प्रतिनिधी अनुपमा सिंग यांनी केली.
वक्फ ही इस्लाममधील एक संकल्पना असली तरी ती या धर्माचा अनिवार्य घटक नाही. वक्फ म्हणजे केवळ एक धर्मादाय उपक्रम असून, त्याला कोणताही धार्मिक स्वरूपाचा अधिकार नाही”, असे ठाम प्रतिपादन केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केले.
भारत सरकारने पाकिस्तान उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याला पर्सना नॉन ग्राटा घोषित केले आहे आणि २४ तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. यासंबंधी पत्र पाकिस्तान उच्चायुक्तालयालाही सादर करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे ‘मान्सून पूर्व तयारी’ संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.
Operation sindoor मध्ये भारतीय सैन्याच्या पराक्रमाने पाकिस्तानचा लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर याची चड्डी फाडली, तरी त्याचा कोट अंगावर शिल्लक राहिल्याने त्याने लगेच आपल्या कोटावर फील्ड मार्शलीचा “मोठ्ठा स्टार” लावून घेतला.
भारताचे सरन्यायाधीश बीआर गवई यांनी बुधवारी सांगितले की, वकिलांना सुट्टीच्या काळात काम करायचे नसते परंतु खटल्यांच्या प्रलंबिततेसाठी न्यायपालिकेला जबाबदार ठरवले जाते. उन्हाळी सुट्टीनंतर याचिका यादीत ठेवण्याची विनंती एका वकिलाने केली तेव्हा मुख्य न्यायाधीश बीआर गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.
नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी १४२ कोटी रुपयांच्या गुन्हेगारी रकमेचा फायदा घेतल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी राऊस अव्हेन्यू कोर्टात केला. या प्रकरणात न्यायालयाने सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा आणि इतरांना नोटीस बजावली आहे.
जागतिक वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टॅनलीने बुधवारी भारताचा विकासदर आर्थिक वर्ष २०२६ साठी ६.२ टक्के आणि आर्थिक वर्ष २७ साठी ६.५ टक्के असा अंदाज वर्तवला. बाह्य अनिश्चिततेमध्येही मजबूत देशांतर्गत अर्थव्यवस्थेमुळे देश जलद आर्थिक विकास अनुभवत असल्याचे वित्तीय संस्थेने म्हटले आहे.
पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. बुधवारी पाकिस्तानमध्ये मुलांना घेऊन जाणाऱ्या शाळेच्या बसला लक्ष्य करून झालेल्या स्फोटात ३ मुलांसह किमान ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच ३८ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही.