NITI Aayog meeting : ‘’केंद्र आणि राज्याने ‘टीम इंडिया’प्रमाणे काम करावे’’
दिल्लीत आज नीती आयोगाची एक महत्त्वाची बैठक झाली. देशातील बहुतेक राज्यांचे मुख्यमंत्री त्यात सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान मोदींनीही बैठकीला संबोधित केले. ते म्हणाले की आपल्याला विकासाचा वेग वाढवावा लागेल. जर केंद्र आणि सर्व राज्ये एकत्र येऊन टीम इंडियाप्रमाणे एकत्र काम करत असतील तर कोणतेही ध्येय अशक्य नाही.