Ahmedabad Plane Crash : संपूर्ण विमान उद्योग या दुर्घटनेचे कारण जाणून घेण्यासाठी अधिकृत चौकशी अहवालाची वाट पाहत आहे.
एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन यांनी सांगितले की, अपघातग्रस्त बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनरची देखभाल व्यवस्थित करण्यात आली होती. त्यांनी सांगितले की या विमानाची शेवटची कसून तपासणी जून २०२३ मध्ये करण्यात आली होती आणि पुढील तपासणी डिसेंबर २०२५ मध्ये करण्यात येणार होती.