Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जगातील सर्वोत्तम नेता’, एलन मस्क यांचे वडील एरॉल मस्क यांनी केले भारताच्या प्रगतीचे भरभरून कौतुक
जागतिक पातळीवरील सुप्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांचे वडील एरॉल मस्क सध्या भारत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगातील सर्वोत्तम नेता म्हणून त्यांनी कौतुक केले आहे. मोदी नेहमी दूरदृष्टीने विचार करतात आणि भारताला ‘विश्वगुरू’ बनवण्याच्या दिशेने नेत आहेत,” असे मस्क म्हणाले.