Shashi Tharoor : राष्ट्रीय मुद्यांवरही काँग्रेसचे राजकारण, शिष्टमंडळात शशी थरूर यांच्या निवडीने मिरची, पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर
पाकिस्तानप्रेरित दहशतवादाचा जगभरात पर्दाफाश करण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेसमध्येच वादाची ठिणगी पडली आहे. महत्वाच्या राष्ट्रीय मुद्यावरही काँग्रेसने राजकारण सुरू केले आहे.