Amir Khan Muttaqi : ट्रम्प यांच्या मागणीवर तालिबानने म्हटले- बग्राम एअरबेस देणार नाही; आमची जमीन कोणाविरुद्धही वापरू देणार नाही
भारत दौऱ्यावर असलेले तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी सांगितले की, बग्राम एअरबेस कोणालाही दिला जाणार नाही. तसेच, अफगाणिस्तान आपला भूभाग कोणत्याही देशाविरुद्ध वापरण्याची परवानगी देणार नाही असेही त्यांनी सांगितले.