PM Modi : PM मोदी क्रोएशियाला रवाना:भारतीय पंतप्रधानांचा पहिलाच ऐतिहासिक दौरा; अनेक करारांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडाहून क्रोएशियाला रवाना झाले आहेत. ते बुधवारी संध्याकाळी २ दिवसांच्या दौऱ्यावर क्रोएशियाला पोहोचतील. पंतप्रधानांच्या ३ देशांच्या ५ दिवसांच्या दौऱ्याचा हा शेवटचा टप्पा आहे. भारतीय पंतप्रधान क्रोएशियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे.