Iran : इराणने घेतला आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय; आता जगात माजणार खळबळ!
तेल आणि गँसच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात एक मोठे संकट येणार असल्याचे दिसून येत आहे. इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावादरम्यान, इराणच्या संसदेने रविवारी एक मोठे पाऊल उचलले आहे. जगातील सर्वात महत्त्वाचा तेल मार्ग होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.