Manipur : मणिपूरमध्ये सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई! तब्बल ३०० हून अधिक ऑटोमॅटिक शस्त्रं जप्त
मणिपूर पोलिस, सीएपीएफ, लष्कर आणि आसाम रायफल्सच्या संयुक्त पथकांनी १३-१४ जूनच्या रात्री, खोऱ्यातील ५ जिल्ह्यांच्या बाहेरील भागात शोध मोहीम राबवली. यामध्ये स्फोटके आणि इतर युद्ध साहित्यांसह १५१ एसएलआर रायफल्स, ६५ इन्सास रायफल्स, ७३ इतर प्रकारच्या रायफल्स, ५ कार्बाइन गन, २ एमपी-५ गन आणि इतर युद्ध साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण ३२८ बंदुका आणि रायफल्स जप्त करण्यात आल्या.