Karnataka: कर्नाटकातील धर्मस्थळ मंदिरात महिलांवर रेप-हत्येचे आरोप; राज्य सरकारने स्थापन केली SIT
कर्नाटक सरकारने धर्मस्थळ मंदिरात महिला आणि मुलींवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. तपास पथकात आयपीएस अधिकारी डॉ. पुनव मोहंती, एमएन अनुचेत, सौम्या लथा आणि जितेंद्र कुमार दयाम यांचा समावेश आहे. रविवारी जारी केलेल्या आदेशात कर्नाटक सरकारने म्हटले आहे की या प्रकरणाव्यतिरिक्त, एसआयटी राज्यातील इतर संबंधित प्रकरणांची देखील चौकशी करेल. महिला आयोगाच्या शिफारशीवरून सिद्धरामय्या सरकारने हा निर्णय घेतला आहे.