जगदीप धनखड यांच्या नादी लागून मोदी सरकार पडायला चंद्रबाबू नायडू 10 वर्षांचा अनुभव विसरलेत का??
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा देऊन 6 दिवस उलटून गेल्यानंतर देखील त्यांच्या राजीनाम्याचे राजकीय लळिताचे कीर्तन संपलेले नाही.
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा देऊन 6 दिवस उलटून गेल्यानंतर देखील त्यांच्या राजीनाम्याचे राजकीय लळिताचे कीर्तन संपलेले नाही.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मधील कारवाईवर आधारित दोन विशेष अभ्यास मॉड्यूल्स तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या विशेष धड्यांद्वारे विद्यार्थ्यांना भारताच्या लष्करी ताकदीची ओळख करून देण्याचा उद्देश आहे.
बिहारच्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा (एसआयआर) पहिला टप्पा शुक्रवारी पूर्ण झाला. आतापर्यंत २२ लाख मृत आणि ७ लाख डुप्लिकेट मतदारांची ओळख पटली आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले. त्याच वेळी २४ जूनपासून ३५ लाख मतदार कायमचे स्थलांतरित झाले आहेत किंवा त्यांचा ठावठिकाणा कळलेला नाही. आयोगाने ६४ लाख मतदारांची स्वतंत्र यादी तयार केली आहे. अशा परिस्थितीत एकूण ६४ लाख नावे मतदार मसुदा यादीतून बाहेर पडतील. निवडणूक आयोगाचे उपसंचालक पी. पवन म्हणाले, राज्यात एकूण ७ कोटी ८९ लाख ६९ हजार ८४४ मतदार आहेत. यापैकी ७ कोटी २३ लाखांनी मतमोजणी अर्ज सादर केले आहेत.
भारतीय रेल्वेने २.५ कोटींहून अधिक आयआरसीटीसी युजर आयडी निष्क्रिय केले आहेत. ऑनलाइन तिकीट बुकिंग प्रणालीतील अनियमितता रोखण्यासाठी रेल्वेने हे पाऊल उचलले आहे.प्रगत डेटा विश्लेषणाद्वारे संशयास्पद बुकिंग पॅटर्न आणि वापरकर्त्यांचे वर्तन ओळखल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. खासदार एडी सिंह यांनी संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सरकारने याची पुष्टी केली आहे.
बिहारमधील गया येथे होमगार्ड भरतीसाठी आलेल्या एका २६ वर्षीय मुलीवर रुग्णवाहिकेत सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी शनिवारी चालक आणि तंत्रज्ञांना अटक केली आहे. घटनेनंतर आरोपीने पीडितेला गप्प राहण्याची धमकी दिली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तामिळनाडूतील तुतीकोरिन येथे ४,९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यामध्ये नवीन विमानतळ टर्मिनल, महामार्ग, बंदर आणि रेल्वे विकास आणि वीज पारेषण प्रकल्पांचा समावेश आहे.
शनिवारी जाहीर झालेल्या ‘डेमोक्रॅटिक ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग’ मध्ये पंतप्रधान मोदी अव्वल स्थानावर आहेत. त्यांना ७५% अप्रूव्हल रेटिंग मिळाले आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग दुसऱ्या स्थानावर आहेत.
लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना उत्कृष्ट संसदीय कामकाजासाठी दिला जाणारा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्राइम फाउंडेशनच्या वतीने हे पुरस्कार दिले जातात. यामध्ये देशातील सतरा खासदार आणि दोन संसदीय स्थायी समिती यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील सात खासदारांनी आपल्या कार्याची चूकुन दाखवत हे पुरस्कार पटकावले आहे.
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील बासगुडा भागात शनिवारी संध्याकाळी झालेल्या चकमकीत जवानांनी ४ नक्षलवाद्यांना ठार मारले. या सर्वांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे, स्फोटके जप्त करण्यात आली आहेत ज्यात INSAS-SLR रायफल्सचा समावेश आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 1 हे लवकरच बंद होणार आहे. येत्या नोव्हेंबर 2025 पासून या टर्मिनलचं नूतनीकरण करण्याचं काम सुरू होणार आहे. त्यामुळे याठिकाणी होणाऱ्या विमानसेवा थांबवण्यात येणार असून प्रवाशांना दुसरीकडे वळवण्यात येणार आहे.
काँग्रेस पक्षात गांधी कुटुंबाच्या पुढे झुकण्याची परंपरा जुनी आहे. पण काँग्रेस नेते उदित राज यांनी लोचटगिरीची कमाल केली आहे. राहुल गांधी जर ओबीसींच्या हक्कांसाठी लढले, तर ते ‘दुसरे आंबेडकर’ ठरू शकतात,” असे विधान उदित राज यांनी केले आहे.
पश्चिम बंगाल सरकारने महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी आणलेले ‘अपराजिता विधेयक 2024’ राज्यपाल आनंद बोस यांनी परत पाठवले आहे. हे विधेयक बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा देण्याची तरतूद करते, मात्र केंद्र सरकारने यावर आक्षेप घेतले आहेत.
बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या विजय दिन परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीबाबत कर्नाटक सरकारने स्थापन केलेल्या न्यायमूर्ती जॉन मायकल कुन्हा आयोगाचा अहवाल शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये, मोठ्या कार्यक्रमांसाठी स्टेडियम असुरक्षित घोषित करण्यात आले आहे.
संपूर्ण देशात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेससाठी १५ महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. हे निर्देश केंद्र किंवा राज्य सरकारने कायदा करेपर्यंत बंधनकारक राहणार आहेत. या आदेशामागचे कारण विशाखापट्टणममध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या १७ वर्षांच्या मुलीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाशी संबंधित आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडे आहे.
ज्या उत्तर प्रदेशाला मागास म्हणून आतापर्यंत सगळ्या देश हिणवत आला होता, तिथे कुशल कामगार आहेत आणि ते केवळ देशातच नव्हे, तर परदेशामध्ये जाऊन कोट्यावधी रुपयांची कमाई करत आहेत असे आता सिद्ध झालेय.
अरे बाप रे, हे काय झाले??; सावरकरांना माफीवीर म्हणता म्हणता राहुल गांधी स्वतःच माफीवीर होऊन बसले!!, असं म्हणायची वेळ राहुल गांधींच्या एका वक्तव्याने आली.
कारगिल विजय दिनाला २६ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त लडाखमधील द्रास येथे आयोजित कार्यक्रमात मनसुख मांडवीय आणि संजय सेठ या दोन केंद्रीय मंत्र्यांनी भाग घेतला. १९९९ च्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना मंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पदयात्रा काढण्यात आली. गेल्या वर्षी २५ व्या कारगिल विजय दिनी पंतप्रधान मोदींनी लडाखमध्ये युद्धातील वीरांना श्रद्धांजली वाहिली.
भारत आता पायलटशिवाय हवाई ड्रोन वापरून दूरवरून शत्रूच्या बंकर किंवा टँकना लक्ष्य करू शकतो. कारण डीआरडीओने आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथील राष्ट्रीय ओपन एरिया टेस्टिंग रेंजमध्ये ड्रोन-लाँच केलेल्या प्रिसिजन गाईडेड-व्ही३ ची चाचणी घेतली आहे. ही माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी शेअर केली. संरक्षण मंत्र्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ड्रोनमधून केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीचे दृश्ये आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर पोहोचले आहेत. राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू त्यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर पोहोचले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारली.
केंद्र सरकारने शुक्रवारी अश्लील सामग्री प्रसारित करणाऱ्या २५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. सरकारचे म्हणणे आहे की हे अॅप्स मनोरंजनाच्या नावाखाली अश्लील आणि आक्षेपार्ह व्हिडिओ सादर करत होते.
नरेंद्र मोदी हे भारताचे दुसरे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले पंतप्रधान बनले आहेत. त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा ४०७७ दिवसांचा (२४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७) विक्रम मोडला आहे. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी पंतप्रधान म्हणून ४०७८ दिवस पूर्ण केले.
सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले भूषण गवई यांनी निवृत्तीनंतर कोणतेही शासकीय लाभाचे पद स्वीकारणार नसल्याचे म्हटले आहे. मी निवृत्तीनंतर जास्तीत जास्त वेळ दारापूर, अमरावती आणि नागपुरात या आपल्या मूळ गावी घालवणार असल्याचे गवई यांनी म्हटले आहे. सरन्यायाधीश झाल्यानंतर प्रथमच भूषण गवई हे त्यांच्या मूळ गाव असलेल्या दारापुरात पोहोचले होते. यावेळी ते गावकऱ्यांशी बोलत होते.
गाझामधील कथित नरसंहाराविरोधात मुंबईच्या आझाद मैदानात मोर्चा काढण्यासाठी परवानगी मागणारी सीपीआय(मार्क्सवादी) पक्षाची याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. गाझाचा कळवळा करण्यापेक्षा देशाच्या प्रश्नांवर बोला असे न्यायालयाने खडसावले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या दिवशी पंतप्रधान पदावर राहण्याचा इंदिरा गांधींचा विक्रम मोडला, नेमका त्याच दिवशी त्यांचे नातू राहुल गांधींनी OBC भागिदारी महासंमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.
गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपाला जामीन मंजूर केल्याबद्दल कर्नाटक उच्च न्यायालयाला दुसऱ्यांदा फटकारले. न्यायालयाने म्हटले आहे की – रेणुकास्वामी हत्या प्रकरणात उच्च न्यायालयाने न्यायालयीन अधिकाराचा गैरवापर केला आहे.