JP Nadda : राहुल गांधींना इतिहास माहिती नाही, काँग्रेसने संविधानाची खिल्ली उडवली – जेपी नड्डा
भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी राहुल गांधींच्या इंडियन स्टेटच्या विधानाला संविधानाची थट्टा असल्याचे म्हटले आहे. तसेच राहुल गांधींच्या इतिहासाबाबतच्या ज्ञानावरही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.