Mahakumbh : ११८ सदस्यीय परदेशी शिष्टमंडळाने महाकुंभात केले संगम स्नान
महाकुंभमेळ्यात, ७७ देशांतील नेते आणि मिशन प्रमुखांचा समावेश असलेल्या ११८ सदस्यीय परदेशी शिष्टमंडळाने त्यांच्या जोडीदारासह संगम स्नान केले आणि या अद्भुत प्रसंगी आपला आनंद व्यक्त केला. शिष्टमंडळात सहभागी असलेल्या विविध देशांच्या राजदूतांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि या महाकार्यक्रमाचे कौतुक केले.