S. Jaishankar : जयशंकर म्हणाले- भारत-अमेरिकेत दुरावा नाही, व्यापारावर चर्चा सुरू
परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, भारत आणि अमेरिकेत व्यापाराबाबत अजूनही चर्चा सुरू आहे आणि आपल्यात कोणतेही “भांडण” झालेले नाही.शनिवारी नवी दिल्लीत झालेल्या इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरम २०२५ मध्ये बोलताना जयशंकर म्हणाले की, भारत शेतकरी आणि लहान उत्पादकांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेत आहे.