Rahul Gandhi : राहुल गांधी उवाच: दलित-मागासांना गुलाम केले जात आहे, IIT-IIMच्या मुलांना नोकऱ्या नाहीत, तुम्हाला कशा मिळणार?
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की मोदीजी जात जनगणना करण्यास घाबरतात. ते कधीच असे करणार नाहीत, पण लोकसभा-राज्यसभेतील 50 टक्के आरक्षणाची भिंत आम्ही पाडू. कोणीही आम्हाला थांबवू शकणार नाही. आम्ही आधी काँग्रेसशासित राज्यांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण देऊ. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर कायदा करून ही भिंत पाडू.