Tejashwi Yadav : तुमच्याच ४७,५०० प्रतिनिधींनी सहभाग घेतला, तेजस्वी यादव यांचे आरोप फेटाळत निवडणूक आयोगाचा पलटवार
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलेच तापले असताना, राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर केलेले निवडणूक फसवणुकीचे आरोप आयोगाने स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहेत. आयोगाने म्हटले की, “हे आरोप बिनबुडाचे, दिशाभूल करणारे आणि खोटे आहेत. SIR प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार राबवली जात आहे.”