CP Radhakrishnan : उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक- NDA उमेदवार राधाकृष्णन यांचा अर्ज दाखल; मोदी पहिले प्रस्तावक
एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यापूर्वी त्यांनी संसदेच्या परिसरात असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केले. त्यांच्यासोबत २० प्रस्तावक आणि २० समर्थकांसह सुमारे १६० सदस्य उपस्थित होते. उपराष्ट्रपती पदासाठी ९ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे.