Supreme Court : वक्फ दुरुस्ती विधेयक २०२५ विरोधात सर्वोच्च न्यायालयात पहिली याचिका दाखल
वक्फ कायद्यातील बदलांविरुद्ध शुक्रवारी (४ एप्रिल २०२५) सर्वोच्च न्यायालयात पहिली याचिका दाखल करण्यात आली आहे. काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद यांनी वक्फ दुरुस्ती विधेयक २०२५ ला आव्हान दिले आहे. लोकसभेत मंजूर झाल्यानंतर, गुरुवारी राज्यसभेतही हे विधेयक मंजूर झाले.