PM Modi : पंतप्रधान मोदी अन् माजी ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट
ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, त्यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या भेटीबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले की, सुनक हे भारताचे चांगले मित्र आहेत. या भेटीदरम्यान सुनक यांचे कुटुंबही उपस्थित होते.