Muhammad Yunus : मोहम्मद युनूस जॉर्ज सोरोस यांच्या मुलाला भेटले; बांगलादेशच्या आर्थिक परिस्थितीवर चर्चा
बांगलादेशच्या अंतरिम सरकारमधील मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस यांचा मुलगा ॲलेक्स सोरोस यांची भेट घेतली आहे. ढाका येथील ओपन सोसायटी फाउंडेशनच्या एका कार्यक्रमात दोघांची भेट झाली. युनूस गेल्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा ॲलेक्सला भेटले आहे.