PM Modi : पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर; सोमनाथमध्ये पूजा केली; आज द्वारका व गीर जिल्ह्याचा दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर पोहोचले. शनिवारी रात्री पंतप्रधान मोदींचे विमान जामनगर विमानतळावर उतरले. पंतप्रधान मोदींनी विमानतळापासून जामनगरमधील पायलट हाऊसपर्यंत ५ किमी लांबीचा रोड शो केला. यावेळी, त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. यानंतर, पंतप्रधानांनी जामनगरच्या पायलट हाऊसमध्ये रात्रीची विश्रांती घेतली.