farmers : केंद्र-आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची बैठक अनिर्णीत; 22 फेब्रुवारीला सहाव्या फेरीच्या चर्चेचे आयोजन
केंद्र सरकार आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळामधील पाचव्या फेरीची बैठक शुक्रवारी (14 फेब्रुवारी) चंदीगड येथे झाली. या बैठकीला 28 शेतकरी नेते उपस्थित होते. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. सुमारे साडेतीन तास चाललेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.