Pahalgam attack : पहलगाम हल्ला : पाक संरक्षणमंत्र्यांकडून धमकी- भारताने पाणी थांबवल्यास हल्ला करू
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची शक्यता असताना, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी शुक्रवारी भारतावर हल्ला करण्याची धमकी दिली. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, ख्वाजा आसिफ म्हणाले की, जर भारताने सिंधू कराराचे उल्लंघन केले आणि सिंधू नदीवर धरणासारखे काही बांधले तर पाकिस्तान भारतावर हल्ला करेल.