Acharya Pramod Krishnam : ”संजय राऊत आणि राहुल गांधी दुसरा पाकिस्तान निर्माण करू इच्छितात”
काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम पक्ष सोडल्यापासून काँग्रेस आणि राहुल गांधींसह सर्व विरोधी पक्षांना सतत लक्ष्य करत आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी आणि शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर मोठा हल्लाबोल केला आहे. संजय राऊत आणि राहुल गांधी भारत तोडून दुसरा पाकिस्तान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केला आहे.