Saif Ali Khan : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला ठाण्यातून अटक; चोरीच्या उद्देशाने घरात घुसला होता, बांगलादेशी असल्याचा संशय
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरावर हल्ला करणारा आरोपी पकडला गेला आहे. शनिवारी रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला ठाण्यातून अटक केली. तो मूळचा पश्चिम बंगालचा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने विजय दास, बिजॉय दास, मोहम्मद इलियास, बीजे अशी अनेक नावे दिली आहेत.